शनिशिंगणापूर विश्वस्तांची उद्या ‘मुंबई वारी’; चारही बाजूंनी चौकशी सुरु…….
सोनई, ता. 17 ः शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील कथित 500 कोटींचा घोटाळा उघड झाल्यावर चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणात विश्वस्तांना नोटीसा बजावल्या. आता उद्या म्हणजेच शुक्रवारी (ता. 18) रोजी देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विश्वस्तांना मुंबईत स्वतः हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत….