राहुरी- शनिशिंगणापूर रस्ता सहा पदरी होणार? कुंभमेळ्यामुळे होणार पुन्हा रुंदीकरण .
नेवासा, ता. 27ः नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जोरदार तयारीला सुरु केली आहे. कुंभमेळ्यातील गर्दी लक्षात घेता, वाहतूक व्यवस्थेसह संपूर्ण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी गेल्या रविवारी नागपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. या बैठकीत पुन्हा एकदा शिर्डी ते शनिशिंगणापर…