
नेवासा, ता. 27ः नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जोरदार तयारीला सुरु केली आहे. कुंभमेळ्यातील गर्दी लक्षात घेता, वाहतूक व्यवस्थेसह संपूर्ण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी गेल्या रविवारी नागपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. या बैठकीत पुन्हा एकदा शिर्डी ते शनिशिंगणापर रस्ता रुंदीकरणाचा विषय झाला.
या बैठकीत संभाजीनगर ते नाशिक, नागपूर ते नाशिक तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या विकासासंदर्भात सखोल चर्चा झाली. या रस्त्यांसाठी निधी मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभ मेळाव्यापूर्वी केंद्र सरकारकडून एकूण नऊ रस्ते विकसित केले जातील अशी माहिती दिली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या कामासाठी ४००० कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. या बैठकीत सावळीविहीर ते शिंगणापूर फाटा (राहुरी) तसेच शिंगणापूर फाटा (राहुरी) ते खरवंडी फाटा हा रस्ता रुंदीकरण करण्याचे ठरले.
कोणते रस्ते होणार?
- घोटी-पहिणे-त्र्यंबकेश्वर-जव्हार फाटा
- द्वारका सर्कल – सिन्नर IC 21 (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे – कोल्हार
- नाशिक ते कसारा
- सावली विहीर IC 20 (समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी – शनी शिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द)
- नाशिक ते धुळे
- त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर
- शॅडो विहिर – मनमाड – मालेगाव
- घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी
- शनी शिंगणापूर फाटा (राहुरी खुर्द) – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)
पुन्हा अतिक्रमण?
राहुरी ते शनिशिंगणापूर रस्ता पुन्हा रुंदीकरण होणार असल्याने या रस्त्याच्या अतिक्रमणधारकांनी पुन्हा धास्ती घेतली आहे. यापूर्वी आलेल्या अतिक्रमणात अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने स्वतःहून काढून घेतली. परंतु तरीही काहींनी अतिक्रमण येण्याची वाट पाहत आपले अतिक्रमण तसेच ठेवले. आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रस्ता रुंदीकरण होणार असल्याने या अतिक्रमण धारकांचे टेन्शन वाढले आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३
अश्याच नव-नवीन बातम्या बघण्यासाठी Subscribe करा .