
सोनई — विजयादशमीचे अवचित साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सोनई शहरात शनिवारी संघाचे पथसंचालन करण्यात आले. स्वयंसेवकाचे शिस्तबंध पथसंचालन व ऊस्थाह संचालन पाहण्यासाठी सोनई कारांना व परिसरातील नागरिकांना संघाच्या गणवेशात स्वयंसेवकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची आणि देशभक्तीची झलक पाहायला मिळाली. यादरम्यान शस्र पूजन व संचालन सहभागी झालेल्या स्वयंसेवक वर महिला, नागरिकांनी जेसिबी द्वारे पुष्पांजली उधळण करून ठिकठिकाणी स्वागत ही करण्यात आले. पथसंंचलन मार्गावर घोषवादनाच्या निनादात निघणारे हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यालागत गर्दी केली होती. तालुक्याचे कार्यवाहक सुनील सावंत यांच्या वतीने मोठ्या संखेच्या उपस्थित संचालन करण्यात आले.. संचालनाची सुरुवात सोनई, महादेव मंदिर पासून ते महादेव मंदिरापर्यंत समाप्त करण्यात आली. विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी विवेकानंद चौक, छत्रपती संभाजी चौक, महावीर पेठ, हलवाई गल्ली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक, राहुरी रोड, श्री रेणुका माता कमान या मार्गे संचलन करण्यात आले.यामध्ये विविध स्तरातील नागरिक सामील झाले होते. पोलीस बंदोबस्त सपोनि. विजय माळी यांनी त्यांच्या सहकारी मार्फत चोख सुरक्षा ठेवण्यात आली होती.

इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
wkkmsqdyloutemhkeomktzyoneriuj