डंपरसह चोरीची वाळू सापडली, पण चालक… नेवासा तालुक्यातील घटना.

नेवासा, ता. 2ः पेट्रोलिंग करत असताना चोरीची वाळू घेऊन जाणारा डंपर शनिशिंगणापूर पोलिसांनी पकडला. खरवंडी शिवारात सीपीएफ कंपनीसमोर ही कारवाई करण्यात आली. परंतु चालकाकडे विचारपूस करत असताना, चालक पळून गेला. या कारवाईदरम्यान, डंपरमागे असलेल्या एका चारचाकी वाहनातून तो पसार झाला. पळून जाताना मात्र डंपर चालकाचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री शिंगणापूर पोलिस स्टेशनचे पोसई कारखेले, चा.पो.कॉ.हे. पवार, पो.कॉ. ठुबे गस्त घालत होते. त्यावेळी खरवंडी शिवारात छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे रोडवर सीपीएफ कंपनीचे समोर पहाटे 04.45 वाजताचे सुमारास विनानंबरचा लाल रंगाचा डंपर पथकाला दिसला. पोलीसांनी डंपर थांबवून पाहणी केली. त्यावेळी डंपरमध्ये वाळु मिळून आली. डंपरचालकास विचारपुस करीत असतानाच तो डंपरच्या पाठीमागुन आलेल्या चारचारी वाहनामध्ये बसुन पळून निघुन गेला. पळत असताना त्याचा मोबाईल फोन हा त्याचे खिशातुन पडला व तो आम्हा पोलीसांनी जप्त केला.

त्यानंतर पोलिसांनी विनानंबरचे डंपरवरील अनोळखी चालक व चालकास पळवुन घेऊन जाणारा डंपरमालक यांचेविरुद्ध शनिशिंगणापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या कारवाईत डंपर, मोबाईल, वाळू असा सुमारे 21,28,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इन्फॉर्मर मराठी :

{{ संपादक : किशोर दरदंले }}

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३

अश्याच नव नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *