
सुरुवात दिवाळीची..
चाटते वासरास गाई..
करी दुग्धपान प्रेमाने!
वात्सल्य मातृ ह्रदयीचे..
वासरु घेई निरागसतेने!
पुजन पहिल्या दिवशी..
मातेच्या वात्सल्याचे!
स्मरण व्हावे तिच्या..
अमृतमयी दुधाचे!
सण दिवाळीचा..
सुरू होतो कृतज्ञतेने!
वात्सल्य मातेचे..
आठवावे माणसाने!
प्रेम वात्सल्य ममता ह्रदयात..
मनी भाव कृतज्ञतेचे!
तेथे आपसुकच क्षण..
होतात दिवाळीचे!!!
कवी:डॉ.बाबा शिंदे.
(शिरुर)
{{ 9822209593}} {{9404509984}}
(1/11/2021)
Happy Vasubaras.
🙏🙏🙏🪔🪔🪔🪔
(Repost: 17/10/2025)
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.