नेवाश्यात भीषण अपघात, 2 ठार तर 13 जखमी; झोपेतच गेला जीव …………

क्रिकेटच्या स्पर्धा पाहून पुण्याहून जळगावकडे परतणाऱ्या युवा खेळाडूंच्या क्रुझर गाडीचा नेवासा फाट्यावळ भीषण अपघात झाला. उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोन जण ठार तर तब्बल 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रथमेश तेली व वृषभ सोनवणे (रा. बोडवड) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती आशी की, जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुले एमपीएल (MPL) क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी गहुंजे (पुणे) येथे गेले होते. ही स्पर्धा पाहून हे विद्यार्थी आपल्या गावी परतत होते. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातल्या उस्थळ दुमाला गावच्या हद्दीत त्यांच्या क्रुझर गाडीचा अपघात झाला. पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागील बाजूला धडक दिली त्यावेळी गाडीतील सर्व विद्यार्थी झोपेत होते, असे सांगितले जात आहे.

या अपघातात तेली व सोनवणे या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तेली या विद्यार्थ्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. गंभीर जखमी सोनवणे या विद्यार्थ्याला तत्काळ नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचार सुरु असताना त्याचाही मृत्यू झाला. इतर 11 विद्यार्थी व शिक्षक गंभीर जखमी झाले. जखमींवर नेवासा फाटा येथे उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. दरम्यान, या अपघातात अकादमीचे एक शिक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा एक पाय निकामी झाल्याचं सांगितलं जात आहे.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *