शिंगणापूर घोटाळ्याचा तपास करणारे ADG यशस्वी यादव नेमके कोण? ते घोटाळेबाजांना ‘साडेसाती’ लावतील का?

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टविरोधात अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताशेरे ओढले. तब्बल ५०० कोटींच्या कथित घोटाळ्यामुळे या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला बरखास्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासंदर्भात शुक्रवारी विधीमंडळात मोठी घोषणा करण्यात आली. भाजप आमदार सुरेश धस आणि स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी या घोटाळ्याचे गंभीर आरोप विधानसभेत मांडले होते. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर ट्रस्टच्या मालमत्तांची चौकशी व सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट संकेत दिले. शिवाय हा तपास महाराष्ट्र सायबरचे सध्याचे पोलिस महासंचालक करतील, असेही स्पष्ट आदेश दिले. या निर्णयामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या विश्वस्तांच्या पाठी ‘शनिची साडेसाती’ लागल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रस्टच्या गैरकारभाराचा पाढाच विधानसभेत मांडला. शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा बोगसपणा ऐकूण सभागृह आवाक झाले. बनावट अँप तयार करुन भक्तांकडून देणग्या घेतल्या जायच्या. ते पैसे बनावट अॅप चालविणारे मालक, अॅपवर काम करणारे कर्मचारी यांच्या खात्यावर जमा व्हायचे. त्यानंतर त्यातील मोठा वाटा या प्रकरणातील मास्टरमाईंडकडे दिला जायचा. 258 कर्मचारी आवश्यक असताना देवस्थानने सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांची भरती केली. ही भरती कशी बोगस होती, याचा पाढाही फडणवीसांनी मांडला. आता पोलिस महासंचालकांमार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले. परंतु महासंचालक कोण, हा प्रश्न यामुळे शनिभक्तांना पडला. सायबरचे विशेष आयजीपी यशस्वी यादव हे या प्रकरणाचा तपास करतील, अशी शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

कोण आहेत यशस्वी यादव?
यशस्वी यादव हे 2000 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्र राज्यासाठी सायबर गुन्हे आणि संबंधित बाबींसाठी नोडल एजन्सी असलेल्या महाराष्ट्र सायबर विभागात विशेष आयजीपी म्हणून कार्यरत आहेत. ते आयआयटी रुरकी येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पदवीधर आहेत. नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडमधून त्यांनी एमबीएही केलं आहे.

कुठे घेतलंय शिक्षण?
यशस्वी यादव यांनी राष्ट्रीय पोलिस अकादमी, हैदराबाद आणि लाल बहादूर शास्त्री अकादमी, मसूरी येथे अतिथी प्राध्यापक म्हणून सायबर गुन्ह्यांमध्ये अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी केंब्रिज विद्यापीठ, यूके येथून मिड-करिअर आणि सायबर गुन्हे अभ्यासक्रम देखील केले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांच्या नावावर अनेक पेटंट आहेत आणि त्यांना अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलिस आयएसीपीने स्थापित केलेला वेबर सीव्ही पुरस्कार आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नन्सचा पुरस्कार यांचा समावेश आहे.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३ अश्याच नव -नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला subscribe करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *