सोनई, ता. 13ः कोट्यवधींच्या महाघोटाळ्यानंतर शनिशिंगणापूर ट्रस्ट बरखास्त करण्यात आले. देवस्थान व सायबर पोलिसांनी याबाबत गुन्हेही दाखल केले. या प्रकरणाची चर्चा थंडावते न थंडावते तोच, आता शनिशिंगणापूर कामगार युनिअनमध्ये तू-तू-मै-मै सुरु झाल्याची चर्चा आहे. देवस्थानच्या कामगार युनिअनमध्ये लवकरच शिवसेना शिंदे गटाच्या युनिअनची स्थापना होणार असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी इन्फाँर्मर मराठीशी बोलताना दिली.
शनि-शिंगणापूर हे एक आगळे-वेगळे गाव आहे. या गावात पाचशे वर्षांपूर्वी पावसाने गावातील पानसना ओढ्याला महापूर आला होता. या पुरात एक दगडी शिळा वाहून आल्याचा इतिहास आहे. ही शिळा बोराच्या झाडाला अडकलेली असल्याचे स्वप्न एका वृद्धास पडले. या दगडी शिळेला मामा-भाच्याने हात लावला, तेव्हा ती जागेवरून हालते, असे त्याच्या स्वप्नात आले होते. यानंतर गावातील पानस ओढ्यातून ही शिळा काढून जवळच तीची स्थापना करण्यात आली. कालांतराने या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करावी या उद्देशाने मंदिर बांधण्यात आले. मात्र, देवाने पुन्हा दृष्टांत देत मंदिर बांधू नये असे सांगितले. त्यामुळे ही शिळा आजही एका दगडी चौथऱ्यावर आहे असा इतिहास येथील नागरिक सांगतात.
सन (१९९३)साली एका दूरचित्रवाणी वाहिनीवर ‘श्री सूर्यपुत्र शनिदेव’ हा चित्रपट दाखविण्यात आला होता. त्यानंतर शनि शिंगणापूर हे गाव सगळीकडे नावारुपाला आले. तेव्हापासून या गावाला भेट देण्यासाठी लोकांची ये-जा सुरु झाली. आज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु घोटाळ्यामुळे हे देवस्थान कायम चर्चेत असते. आता देवस्थान ट्रस्ट बरखास्त केल्यानंतर काही कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला.
येथील सध्याच्या युनिअनचे काही पदाधिकारी विचारात घेत नाहीत, असाही आरोप काही कामगारांनी केला आहे. युनिअनमध्येही राजकारण घुसल्याचा आरोपही काही कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे आता राष्ट्रीय शिवसेना शिंदे गटाची युनिअन करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत कृष्णा संतोष दरंदले यांनी माहिती दिली तरी, या आठवड्यात या युनिअनचे पदाधिकारी निवडले जातील अशी चर्चा होत आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३ अश्याच नव-नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला subscribe करा .