मा. न्यायालयाचे पकड वॉरंट असलेल्या 03 आरोपींना शनिशिंगणापुर पोलीसांनी शिताफीने केली अटक…..

वॉरंट असलेले तीन आरोपी अटक….. सोनई वार्ताहर, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, या पथकाने
न्यायालयीन पकड वॉरंट असताना गेले अनेक दिवसांपासून फरार असलेले तीन आरोपीस सीताफिने अटक करून न्यायालयापुढे हजर केले आहे. पोलीस अध्यक्ष सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अध्यक्ष सोमनाथ वाकचौरे, व पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके ,या पथकाने (अनिल किसन आठवले), राहणार (वडाळा बहिरोबा) (सदाशिव भाऊसाहेब लांडगे व मोगल दादाबा लांडगे ),दोघेही राहणार रस्तापूर तालुका नेवासा यांना अटक करून न्यायालयापुढे उभे केले न्यायाधीशांनी सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली फौजदार ज्ञानेश्वर माळवे हवालदार रमेश लबडे, आदेश घोडके, संजय हिवाळे, अजय ठुबे ,सागर शेजुळ वृषाली गर्जे व स्वाती तडूळकर यांचा समावेश होता.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३ अश्याच नव-नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *