सूर्या कमलेश काकडे लॉन टेनिस स्पर्धेत,,, जिल्ह्यात प्रथम……

सोनई , [ प्रतिनिधी किशोर दरंदले ] , नेवासा तालुक्यातील सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोनई येथे इयत्ता अकरावीत शिकणारा विद्यार्थी सूर्या कमलेश काकडे याने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय Lawn tennis ( लॉन टेनिस ) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कडव्या स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर विद्यार्थी सूर्या काकडे याने अंतिम फेरीत प्रतिस्पर्धकावर मात करून प्रथम क्रमांक मिळवला. तरी सदर विद्यार्थ्यांची झोनल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक किरणजी सोनवणे सर व विद्यालयाच्या प्राचार्या ज्योती सोनवणे मॅडम, व शिक्षक, पालक वर्ग तसेच ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे. त्याच्या या यशामध्ये सर्व शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्याच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.

One thought on “सूर्या कमलेश काकडे लॉन टेनिस स्पर्धेत,,, जिल्ह्यात प्रथम……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *