शनिशिंगणापूर लूट पॅटर्न : फडणवीससाहेब, भाजपवरचा विश्वास वाढविण्याची संधी सोडू नका.
सोनई, ता. 13 ः शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये कर्मचारी, पुजारी व विश्वस्तांनी बनावट अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने ५०० कोटींहून अधिक पैसे लुटल्याचा आरोप होत आहे. हा मुद्दा आ. विठ्ठल लंघे, आ. सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत उपस्थित केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी…