
भूम तालूक्यातील पाथरूड येथे असलेल्या साई कॅम्पुटर अकॅडमी ला छत्रपती संभाजीनगर येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी विभागीय सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र हा मानाचा सन्मान / पुरस्कार एम के सी एल (MKCL ) मार्फत प्रदान केला.
याचे औचित्य साधून मौजे जांब जन्मभूमिच्या ठिकाणी पाथरूड व पंचक्रोशितील विद्यार्थ्यांना / प्रशिक्षणार्थ्यांना बदलत्या काळानूरूप प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करणाऱ्या या संस्थेला मौजे जांब येथील कार्य – कर्तुत्ववान सरपंच श्री समाधान अरून भोरे व ग्रामपंचायत अधिकारी हराळे रेखा गोवर्धन यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती भूमचे नव नीर्वाचित सभापती श्री प्रविन भैया देशमुख यांच्या हस्ते हा सन्मान / सत्कार केला.
तसेच आशोक जाधव, आरून अडागळे, सुग्रीव भोरे, रमेश मूळूक सर्व प्रसिद्ध सदस्य , सर्व शाळेचे मुख्याध्यापक , सर्व सहशिक्षक , अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी, तसेच समस्त गावकरी ग्रामस्त मोठ्या संखेने उपस्थित होते.
या सर्व स्नेहीचे साई कॅम्पुटर अकॅडमी पाथरूडच्या संचालिका सौ. दिपाली उमेश झोळ व उमेश भागवत झोळ यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }},{{ ९४०४५०९९८४ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
.
p5dkad
uxjm7q