
शिबीरात 45 महिला आणि 28 पुरुषांची तपासणी करण्यात आली.
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य शिबीर आज दिनांक 20/09/25 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनई येथे आयोजित करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन डाॅ. सागर शिरसाठ, स्त्रि रोग तज्ञ यांचे हस्ते करण्यात आले. डाॅ संतोष विधाते यांनी प्रा. आ. केंद्रात आणि उपकेंद्रात या अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत शिबीर घेणार असल्याचे सांगितले. डाॅ. क्षितिजा ईंगळे यांनी महिलांना उत्तम आरोग्यासाठी या शिबींरांमधे तपासणी करण्याचे आव्हान केले. ए. एन. एम. श्रीमती. अरुणा म्हस्के, आरोग्य सेवक वैभव लष्करे, स्वप्निल उके यांनी शिबीराचे व डाॅ. सुदाम लांडे बालरोग तज्ञ यांनी शिबीरात भाग घेतला.

इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.