लोकप्रतिनिधी शांत कसे..? शनिशिंगणापूर प्रकरण दाबलं जातंय का ?
नेवासा, ता. 27ः साडेसाती लावणारा व त्यातून दिलासा देणारा देव म्हणून शनिदेव जगविख्यात आहे. परंतु याच शनिदेवाच्या मंदीराला सध्या घोटाळ्याची साडेसाती लागली आहे. विशेष म्हणजे मंदीरात पोट भरणाऱ्याच काही कर्मचारी, पुजाऱ्यांनी ती लावलीय, अशी चर्चा होत आहे. राज्यात ज्यांची सत्ता आहे, त्या पक्षाच्याच काही स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची फिर्याद दिली, परंतु महिना उलटूनही, या प्रकरणाचा…