
पाथरूड येथील साई कम्प्यूटर अकॅडमी या सेंटरला सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले , दिनांक 05-08-2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमा मध्ये एम. के. सि. एल. मार्फन हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला , गेली 9 वर्षापासून पाथरूड व पाथरूड परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना काळानूरूप संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना आत्म निर्भर करणाऱ्या या प्रशिक्षण संस्थेला हा विभाग स्तरावरिल पुरस्कार / सन्मान मिळाला आहे.
अशा या प्रसंगी धाराशिव जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर, विभागिय सल्लागार बालकिशन बलदवा, विभागिय समन्वयक गजानन कुलथे , वरिष्ट जनरल मॅनेजर अतूल पतोडी, अमित रानडे , सर्व एम. के. सि. एल. टिम व छ. संभाजीनगर विभागातील सर्व केंद्र संचालक व केंद्र संचालीका मोठ्या संखेने उपस्थित होते.
साई कम्प्यूटर अकॅडमीला मिळालेल्या या सर्वोत्कृष्ट पुरस्काराचे संपूर्ण श्रेय हे सर्व विद्यार्थी व पालकांनी व सर्व समाज परिवाराने ठेवलेल्या विश्वासाला जाते, असे मत केंद्र संचालिका सौ. दिपाली उमेश झोळ व उमेश भागवत झोळ यांनी व्यक्त केले .
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले :
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : {{ ९४०४५०९९८४ }}
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अश्याच नव-नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.