
नेवासा- प्रतिनिधी किशोर दरंदले :
आरोपींकडून 33 लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गुन्हेअन्वेषण विभागाचे किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत सोनई पोलीस स्टेशन हद्दीत घोडेगाव गावचे शिवारातील शेख वस्ती या ठिकाणी फिरोज शेख हा आणि त्यांचे साथीदाराचे मदतीने महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरे कत्तल करण्यास मनाई असताना त्याने काही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून बिना चारा पाण्या वाचून दाबून ठेवले असून सदर जनावरे ट्रकमध्ये भरून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा येथील पोनी किरण कुमार कबाडी , सपोनी/हरीश भोये, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, गणेश लोंढे, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, सोमनाथ झांबरे, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालिंदर माने, प्रमोद जाधव, उमाकांत गावडे , अरुण मोरे, सारिका दरेकर, सुवर्णा गोडसे, यांची स्वतंत्र तीन पतके तयार करून सदर पथकासह घोडेगाव ते सोनई जाणारे रोड लगत, शेख वस्ती या ठिकाणी जाऊन खात्री करता काही इसम एका ट्रकमध्ये गोवंशीय जनावरे भरताना दिसून आले. सदर इसमांकडे जात असताना जनावरे भरणारे इसम पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागले. सदर इसमांचा पाठलाग करून त्यातील तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारता त्यांनी फिरोज रशीद शेख ( वय ३६ वर्ष), रा.घोडेगाव , लाला उर्फ अफताब हरून शेख (वय २८) रा.सदर, शुभम बाळासाहेब पुंड ( वय २५) रा. माळीचिंचोरा,. असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पळून गेलेल्या इसमान बाबत विचारपूस करता त्यांनी पळून गेलेल्यांची नावे भारत भाऊसाहेब शहाराव, रा.फत्तेपूर (फरार) , जुनेद शेख (पूर्ण नाव माहित नाही) रा. मुंगी ता. शेवगाव (फरार) असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे कब्जामध्ये 13 लाख रुपये किमतींची 26 जिवंत गोवंशय जनावरे वीस लाखांचा एम. एच.११ सी. एच ८५९९ या क्रमांकाचा ट्रक असा एकूण 33 लाख रुपये किमतीचा मध्यमाल हस्तगत करण्यात आला.
सदरील इस्मान विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३५०/२०२५ महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारित २०१५ चे कलम ३ व ११ प्रमाणे पोलिस नाईक सोमनाथ झांबरे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करीत आहे. सदरची कारवाई श्री. सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
2c7q3k