शनिशिंगणापूर अॅप घोटाळा : फक्त ‘त्या’ दोघांना बळीचा बकरा करुन प्रकरण दडपले जाईल का ?
सोनई, ता. 2ः कोट्यवधींचा अॅप घोटाळा उघडकीस आल्यापासून शनिशिंगणापूर चांगलेच चर्चेत आले आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर एक कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकारानंतर ते दोन कर्मचारी कोण? अशा चर्चा सुरु झाल्या. परंतु फक्त एक कोटींचा खुलाशापुढे हा तपास जाईल का, हा प्रश्न होऊ…