शनैश्वर देवस्थान कार्यालय सील झाले; पण दोषींना अटक कधी होणार…..?

किशोर दरंदले : इन्फाँर्मर न्यूज

सोनई, ता. 29 – देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर येथील देवस्थान कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. देवस्थान सरकारच्या ताब्यात घेण्याचा निर्णय होऊन विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर त्यात काही फेरफार सुरु असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे देवस्थानच्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपाला आणखी बळ मिळाले आहे.

शनैश्वर देवस्थानवर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्ट्राचार, बोगस कर्मचारी भरती असे आरोप आहे. शिवाय देवस्थानमधील बनावट अँप घोटाळा, बनावट पावती पुस्तक घोटाळा आणि बनावट क्यू-आर घोटाळाही चर्चेत आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा भ्रष्ट्राचार विधानसभेत सांगितला. त्यानंतर शासनाने धर्मादाय आयुक्त, सायबर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा असा तिहेरी तपास सुरु केला. परंतु आता दोन महिने उलटत आले तरी, या तिन्ही विभागाकडून कुणालाच अटक होत नसल्याने, प्रकरण दडपल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आता जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थानचे कार्यालयच सील केल्यानंतर पुन्हा भ्रष्ट्राचाराची चर्चा सुरु झाली.

चौकट 1
नेमकी का केली कारवाई?
देवस्थान विश्वस्त मंडळावर गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. देणग्यांमधील अपहार, खर्चातील अनियमितता, बोगस कर्मचारी भरती, अशा विविध मुद्द्यांवरून विश्वस्त मंडळाविरोधात असंतोष वाढला होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकीय नियंत्रणाचा निर्णय घेतला. बरखास्तीनंतरही देवस्थानातील कागदपत्रांवर शंका निर्माण झाल्याने प्रशासनाला थेट सील करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

चौकट 2
कार्यकारी अधिकारी गैरहजर
एवढी मोठी कारवाई होत असताना देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी मात्र गैरहजर होते. या कारवाईदरम्यान आ. विठ्ठल लंघे, भाजपचे सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे आदी कार्यकर्ते हजर होते. गावातील सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते. दरम्यान, देवस्थानचे पदाधिकारी गैरहजर असल्याने चर्चा वाढल्या.

चौकट 3
अटक सत्र नेमके कधी?
देवस्थानमधील गैरव्यवहाराच्या चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी तीन प्रकारे तपास सुरु केला. या प्रकाराला आता दोन महिने होत आले. तरीही अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. फक्त तपास सुरु आहे, असे टिपीकल उत्तर देणे सुरु आहे. त्यामुळे अँप घोटाळा, बनावट क्यू-आर घोटाळा व बनावट पावती पुस्तक घोटाळा दाबला दात आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. पोलिस अटकसत्र कधी सुरु करणार, याची प्रतिक्षा आता शनिभक्तांना आहे.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *