वर्गमित्रांनी दिला आपुलकीचा हात; ‘अनाथांच्या नाथा’ला केली मदत…….

सोनई, ता. 29 – मुळचे सोनई येथील रहिवासी राजेंद्र दरंदले यांचे धाराशिव जिल्ह्यात आपुलकी वसतिगृह आहे. तेथे ते अनाथ व निराधार मुलांचा सांभाळ करतात. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या आपुलकी वसतीगृहात पाणी शिरले. पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले. निराधारांना साभांळणाऱ्या नाथाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. अखेर याच अनाथांच्या नाथाच्या मदतीला त्याचे वर्गमित्र धावले अन् निराधारांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.

त्याचे झाले असे की, राजेंद्र गुलाबराव दरंदले यांचे धाराशिव जिल्ह्यात आपुलकी वसतिगृह आहे. तेथे ते सुमारे 30 ते 40 निराधार मुलांचा सांभाळ करतात. शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर त्यांची ही तारेवरची कसरत सुरु आहे. स्वतः काबाडकष्ट करुन इतर देणगीरांच्या जिवावर हे अनाथालय सुरु आहे. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु आहे. याच पावसाचा फटका या वसतिगृहालाही बसला. या वसतीगृहात पाणी शिरल्याने तेथील किराणा माल व इतर सामानाचे नुकसान झाले.

राजेंद्र दरंदले यांनी त्यांची ही कैफीयत सोशल मीडियावर टाकली. त्यानंतर त्यांच्या वर्गमित्रांनी सोशल मीडियावरच मदत करण्याचे ठरवले. सागर खोसे, लक्ष्मण पवार, महेश भालसिंग, उमेश जोशी , संतोष बर्फे, बाळासाहेब ढाकणे, चेतन बडगुजर, रुपेश कुसळकर, मोरे ज्ञानेश्वर ,राजू शिंदे ,विष्णू शिरसाट, गणेश कंक, संदीप भुसारी, उमेश मोकाटे, विकास बानकर, काकासाहेब बारगळ, संतोष राऊत, सतीश गाडे, सुहास भुसाळ, निलेश कोल्हे, निशांत पांडे, सुहासिनी नवगिरे, जयश्री कुसळकर, वर्गशिक्षिका मंदाकिनी हुळहळे यांनी तातडीने गरजेच्या वस्तू पोहोच केल्या.

सोनईतील रहिवाशी राजेंद्र दरंदले यांना अजूनही मदतीची अपेक्षा आहे. त्याबद्दल कुणाला मदत पाठवायची असल्यास राजेंद्र दरंदले सर मो. ( 9404509984) या गुगल पे क्रमांकावर ती पाठवू शकता.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *