एक कोटींचा खर्च, प्रति तुळजापूरची झलक..! दरंदले पाटलांचा नादच न्यारा………….
सोनई, ता. 14ः सोनई येथील दरंदले गल्लीत सुमारे एक कोटींच्या लोकवर्गणीतून तुळजाभवानी मंदीराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या मंदीराचा सुमारे पाच दिवसांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोनई पंचक्रोशीतील दरंदले पाटील परिवाराच्या पुढाकारातून हे मंदीर साकारण्यात आले आहे. सोमवार दि. 18 ऑगस्टपासून हा सोहळा सुरु होणार आहे. सोनई हे ऐतिहासीक गाव आहे. कौतुकी…
