सोनईत टोळीयुद्ध; तीन गंभीर जखमी, 20 जणांवर गुन्हे दाखल….

सोनई, ता. 5 ः नेवासा तालुक्यातील खेडले परमानंत शिवारातील सोनई रस्त्यावरील एका हाँटेलमध्ये रविवारी तुंबळ हाणामारी झाली. धारदार शस्त्रे, तलवारी, लाठ्या-काठ्यांनी झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघे जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या सुमारे 20 जणांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या हाणामारीत जखमी झालेल्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोनई पोलिसांनी त्यांचा जबाब घेतल्यानंतर गु्न्हा दाखल केला. एका गटातील सहा जणांवर तर दुसऱ्या गटातील 14 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी विलास बबन आयनर, गणेश चितळकर, बापू चोपडे, हरिहर औटी, अक्षय लाटे (रा. तामसवाडी), राजू जगताप (रा. करजगाव), आकाश तांबे (रा. पानेगाव), पंकज कोठवळ, वैभव वाघ (रा. सोनई), पंकज तमनर, अक्षय तमनर (रा. तमनर आखाडा), प्रमोद सोनवणे (रा. वाटापूर), अक्षय राजळे (रा. वळण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही फिर्याद पांडूरंग धर्माची पवार यांनी दिली. एक वर्षापूर्वी खरवंडी येथे ट्रॅक्टर पेटविल्याचे रागातून ही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसऱ्या फिर्यादीत करजगाव येथील लक्ष्मी काँर्नर येथे वाहनाने धडक देऊन व अँसिड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद विलास आयनर यांनी दिली. त्यावरुन कर्णासाहेब पवार, पांडूरंग पवार, कुंदा पवार, सरिता पवार, शुभम पवार, दादासाहेब पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही फिर्यादी दाखल झाल्यानंतर सोनई पोलिसांचे पथक सध्या आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहे.

इन्फॉर्मर मराठी :-

संपादक : किशोर दरदंले :-

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अश्याच नव-नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *