‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांसाठी सवाद्य मिरवणूक; मूळगावी भव्य सत्कार

छावा’

या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा त्यांच्या मूळगावी सत्कार करण्यात आला आहे. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने आतापर्यंत 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित

‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्नाने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून भरभरून कौतुक

होत आहे. चित्रपटाला देशभरात मिळालेल्या प्रतिसादानंतर आता रायगडमधील मोरसडे इथल्या मूळगावी घोसाडवाडी इथं लक्ष्मण उतेकर यांचा सत्कार करण्यात आला आहे.मोरसडे या मुळगावी उतेकर भावकी, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पायी चालत सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पायी चालत सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पायी चालत सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.मोरसडे या मुळगावी उतेकर भावकी, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीन याप्रसंगी पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. लक्ष्मण उतेकर यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला. याचे फोटो समोर आले आहेत.’छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. गेल्या 47 दिवसात या चित्रपटाने भारतात 594.88 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विकी कौशलच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.मोरसडे या मुळगावी उतेकर भावकी, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *