देशावर अमेरिकेकडून कर लादला जाणार आहे याचा विसर पडावा म्हणून ईदच्या पार्ट्या झोडून वक्फचं विधेयक आणलं गेलं असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
Uddhav Thackeray
आज ३ एप्रिल आहे आणि काल २ एप्रिल होती. अशी सुरुवात अशासाठी केली की आठवण होऊ नये म्हणून काल वक्फची चर्चा घडवली. अमेरिकेने भारताला सांगितलं होतं की कर कमी करावे नाहीतर आम्हीही कर लादू. याची सुरुवात झाली आहे याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून वक्फ विधेयक मांडलं गेलं असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
आर्थिक संकटाबाबत देशाला विश्वासात घ्यायला हवं होतं
देशाला विश्वासात घेणं आवश्यक होती. आपल्याला काय पावलं उचलावी लागतील? परिणाम काय होतील याची चर्चा सरकारने करायला हवी होती. करोना काळात मी मुख्यमंत्री होतो. मोदीही तेव्हा घरी बसूनच काम करत होते. आमच्याशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली होती. तसं काहीतरी करुन मोदींनी अमेरिकेच्या करांबाबत सांगितलं असतं तर आम्ही पाठिंबा दिला असता. अमेरिकेने आयात शुल्क लावलं हे कळू द्यायचं नाही म्हणून वक्फचा विषय आणला गेला.