शिंगणापूर घोटाळ्याचा तपास करणारे ADG यशस्वी यादव नेमके कोण? ते घोटाळेबाजांना ‘साडेसाती’ लावतील का?
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टविरोधात अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताशेरे ओढले. तब्बल ५०० कोटींच्या कथित घोटाळ्यामुळे या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला बरखास्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासंदर्भात शुक्रवारी विधीमंडळात मोठी घोषणा करण्यात आली. भाजप आमदार सुरेश धस आणि स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी या घोटाळ्याचे गंभीर आरोप विधानसभेत मांडले होते. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री…