फक्त ‘याच’ महिलांना आलाय मे महिन्याचा लाडकी बहिणीचा हप्ता.

लाडक्या बहिणींनो पटापट बॅलन्स चेक करा, काहींना 500 रुपयेच आले .

सोनई, ता. 5 ः महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी, महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. सध्या महिलांना मे महिन्याच्या हप्ताची प्रतिक्षा होती. परंतु आता त्याबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंबंधी माहिती त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केली आहे.

कितवा हप्ता आलाय?

महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली. या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा निश्चित सन्मान निधी देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा आहे. मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी महिलांमध्ये उत्सुकता होती. अखेर हा हप्ता खात्यावर जमा झाल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे. सध्या वितरीत होत असलेला हप्ता हा 11 वा आहे. या योजनेतून आतापर्यंत एकूण 16,500 रुपये वितरित करण्यात आले आहेत.

फक्त ‘या’ महिलांना आले पैसे

एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मे रोजी देण्यात आला होता. यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे देण्यात आला होता. ही सुविधा विशेषतः त्या महिलांसाठी मोठा आधार बनली आहे, ज्या स्वयंपूर्ण उपजीविकेसाठी सरकारी योजनांवर अवलंबून आहेत. मात्र, सर्व लाभार्थ्यांना 1,500 रुपये मिळत नाहीत. काही महिलांना, विशेषतः ज्या पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतात, त्यांना या योजनेतून केवळ 500 रुपये मिळतात. त्यामुळे लाभामध्ये थोडा फरक दिसतो.

अनेक महिलांना वगळले

सरकारच्या तिजोरीवर ताण पडू लागल्याने या योजनेची चौकशी सुरु करण्यात आली. त्यात अनेक महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या पुढे असलेले आढळले. शिवाय एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही आढळल्या. शिवाय चारचाकी वाहन ज्यांच्या नावावर आहे, अशा महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला होता. या सर्वांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *