बापरे बाप ! शनि देवाच्या नावाने सात बोगस ॲप.

(प्रतिनिधी मोहन शेगर सोनई)

शनिशिंगणापूर बनावट ॲपच्या माध्यमातून.
शनैश्वर देवस्थानची तिजोरी एक, दोन नव्हे तर तब्बल सात ॲपच्या माध्यमातून पोखरली जात असल्याचे प्रचंड धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे येथील आर्थिक घोटाळ्याची व्याप्तीही कल्पनाशक्तीच्या पलिकडे असण्याचा कयास बांधण्यात येऊ लागला आहे.
देवस्थानला मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग बनावट अॅप, क्यू आर तसेच पावती पुस्तकांच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या वळवून करोडो रुपयांची ‘ शिंगणापूर’ची चोरी काही जागरुक कामगारांमुळे उघडकीस आलेली आहे. देवस्थानात कर्मचारी म्हणून मिरविणाऱ्या बदमाशांच्या टोळीने भल्याभल्याची मती गुंग करणाऱ्या या कारनाम्यातून डोळे दिपवणारी प्रगती (?) केल्याचे यानिमित्ताने समोर येऊ लागले आहे. यातील बहुतांश बदमाशांची देवस्थानच्या सेवेत रुजू

होण्यापूर्वी अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने दोन वेळच्या खाण्याची भ्रांत मिटविण्यासाठी त्यांना रात्रंदिवस अक्षरशः मोलमजूरी करुन राबावे लागत असल्याची आठवण त्यांचेच एकेकाळचे श्रमिक सहकारी यानिमित्ताने करुन देत आहेत. देवस्थानात २० ते २५ हजार रुपये पगारावर नोकरीस लागल्यापासून त्यांचे राबणे थांबून जगण्याची थोडीफार शाश्वती निर्माण झाली होती. परंतु अवघ्या काही वर्षांत
त्यांच्या इतिहास, भूगोलात घडून आलेला आमुलाग्र बदल पाहिल्यानंतर त्याला गुन्हेगारीचा वास असल्याची शंका त्यांना होतीच. यानिमित्ताने ती खरी ठरल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होऊ लागले आहे. कोट्यावर्षीच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता, महागड्या गाड्या, उंची राहणीमान यामुळे या लोकांना देवस्थान पगार नक्की किती देते? असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. हे लोक कोणत्यातरी गैरमार्गाने पैसा मिळवत असल्याची चर्चा सर्वत्र होतीच. परंतु त्यांच्या या गैरमार्गाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत सापडत नव्हता. देवस्थान

प्रशासनात या टोळीने रिंगण टाकून बहुतांश करुन आपल्या सदस्यांचीच प्रत्यक्ष देवस्थान परिसरात ‘ड्यूटी’ लावण्याची दक्षता घेतली जात असल्याचे दिसून येते. देवस्थानशी प्रामाणिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अत्यंत चतुराईने देवस्थान परिसराच्या बाहेर रुग्णालय, भक्तनिवास, गोशाळा, पार्कीग आदी ठिकाणी नियुक्ती केली जात
असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्यामुळे देवस्थान परिसरात या बदमाशांकडून सुरु असलेल्या प्रतापांची शंका येण्यास मोठा कालावधी लागला. काही देवस्थानशी प्रामाणिक परंतु चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या टोळीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी खोलात जाऊन पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या बनावट ॲप क्यू आर आणि पावती पुस्तकांचा प्रताप समोर आल्याचेसांगण्यात येते. ‘नेवासा टाइम्स’ने गेल्या दहा दिवसांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतरच्या दैनिक प्रभात मुळे शिंगणापूर’च्या असंख्य करामती हळूहळू बाहेर येऊ लागल्या आहेत. देवस्थानचे कर्मचारी म्हणून मिरविणाऱ्या या बदमाशांपैकी अनेकांकडे बनावट देणगी पावती पुस्तके असल्याचे सांगण्यात येत असून यापैकी काहींना यापूर्वीच रंगेहात पकडून देखील देवस्थान प्रशासनाने त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई न करता त्यांना सोडून दिल्याचे रंजक किस्से ऐकावयास मिळत आहेत. तर देवस्थानचे स्वतःचे अधिकृत ॲप असताना या टोळीने एक, दोन नव्हे तर तब्बल सात ॲपच्या माध्यमातून देवस्थान महसूलाची परस्पर लूट केल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
दरम्यान, या घोटाळ्याचे गांभिर्य लक्षात येऊनही शनैश्वर देवस्थान प्रशासन दाताखाली मूग धरुन बसल्याचे दिसून आल्याने अस्वस्थ बनलेल्या तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करुन आंदोलनाची भुमिका जाहीर केली आहे. प्राथमिक अंदाजापेक्षाही या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी असण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
चौकट :-
सध्या देव एक प्रॉडक्ट आहे, ट्रस्टी-पुजारी-कर्मचारी-स्थानिक हे त्याचे विक्रेते आहेत अन् भाविक-भक्त हे ग्राहक आहेत… हे सुरळीत सुरू राहिलं. तर सगळे आनंदी असतात.. पण तिथेच बोगसगिरी सुरू झाली तर मग सगळं गणित बिघडतं. त्याचं शनि शिंगणापूर हे उदाहरण म्हणता येईल. देवस्थानाला विकास करण्यासाठी पैसे लागतात ही खरं आहे. मात्र त्याचं एक प्रमाण असायला हवं. चौथऱ्यावर जायला जिथे पैसे मोजावे लागतात. त्याच ठिकाणी येथील ठराविक कर्मचारी असे घोटाळे करतात. श्रद्धेच्या नावाखाली लुटलं जातं. तिथे देव खुश असेल का? हाच मोठा प्रश्न…
सामाजिक कार्यकर्ता संदीप कुसळकर

चौकट:-
शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये शनि देवाच्या ॲप च्या नावाने जे संचालक मंडळ असेल कर्मचारी असेल पुजारी असेल यांची सखोल चौकशी करून लाटलेले कोटी रुपये देवस्थानच्या तिजोरी जमा करावे . व त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा
सामाजिक कार्यकर्ते अनिल निमसे.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

वाढदिवस,, हॉटेलच्या, तसेच सर्व प्रकारच्या बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *