
विशेष कॅन्सर व्हॅन करणार रुग्णांची तपासणी, डाँ. विधाते यांची माहिती :
सोनई, ता. 5 सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी व कर्करोगाचे निदान लवकर व सुलभ करण्यासाठी आरोग्य विभागाने एका नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. अहिल्यानगर जिल्हा आरोग्य विभागामार्फत अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन (फिरते रुग्णालय) सुरु करण्यात आली आहे. ही व्हॅन गुरुवारी (6 मे) सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष विधाते यांनी दिली.
गाव-खेड्यातील रहिवाशांपर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्य तपासणी मोहिम जावी, असा या योजनेचा उद्देश आहे. कॅन्सरसारख्या आजाराचे वेळेत निदान झाले तर, संभाव्य रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होईल, असा सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी शासनातर्फे ही सुसज्ज व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये सुरुवातीला डिजीटल मशिन वापरुन स्तनाच्या तपासण्या व काॅल्पोस्कोप वापरुन गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.
सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. 6 जून रोजी ही व्हॅन येणार आहे. या व्हॅनसोबत कॅन्सर रोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, दंत रोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ यांची टीम असणार आहे. या योजनेचा परिसरातील नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष विधाते यांनी केले आहे.
