शेवगाव येथे देवाभाउ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळासंपन्न !

(किशोर दरंदले : नेवासा , प्रतिनिधी)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाउ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील खंडोबा माळावरील मैदानात मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा संपन्न झाला.तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री, आँखेगावच्या जोग महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के, रेणुका माता मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत नाना भालेराव यांच्या हस्ते आणि ह.भ.प.बटुळे महाराज, डॉ. निरज लांडे, डॉ. कृष्णा देहडराय , नंदू मूंढे, उदय मुंढे,यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.सदर कुस्ती स्पर्धा या २८/२९ मे रोजी सुरू होणार होत्या परंतु अचानक आलेल्या पावसाने व्यत्यय आल्यामुळे पाच सहा दिवस पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दिनांक ४ आणि ५ जून रोजी या स्पर्धा संपन्न होत आहेत.या स्पर्धेचे खास आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे कै.छबू पैलवान लांडगे यांच्या स्मरणार्थ प्रथम बक्षीस म्हणून चांदीची गदा देण्यात येणार आहे. रोख स्वरूपातील दोन लाख,दीड लाख,आणि एक लाख रुपयांच्या मानाच्या तिनं कुस्त्या होणार आहेत.तसेच ४२,८४,१२० किलो वजन गटातील ही ईतर कुस्त्या होणार आहेत.तरी या आकर्षक कुस्ती स्पर्धेसाठी आणि बक्षिस वितरण सोहळ्यासाठी जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरूण भाउ मुंढे यांनी केले आहे.

(सुरेश पाटील,शेवगांव प्रतिनिधी)

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *