शनि चौथऱ्याचे शुद्धीकरण, परधर्मिय लोकांकडून सुशोभिकरण केल्याने हिंदूत्ववादी संघटनांची नाराजी .

सोनई , ता . 22 : शनिशिंगणापूर येथील शनीचौथारा सुशोभीकरणाचे काम सुरू आहे .

या कामावर [बुधवारी ता. 21] गैर हिंदू कारागीर दिसल्यानंतर आज सायंकाळी भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू युवकांनी चौथरा व परिसराचे शुद्धीकरण केले ,

तसेच विश्वस्त मंडळाचा जाहीर निषेध केला .
शनिशिंगणापूर येथे काल बुधवारी शनि चौथर्‍यावर गैरहिंदू कारागीर सुशोभीकरणाचे काम करीत असताना भाजपचे शेटे यांनी देवस्थान प्रशासनास जाब विचारला होता . मांसाहार करणाऱ्या कारागिरांमुळे येथील पावित्र्येला गालबोट लागल्याने आंदोलनाची हाक देण्यात आली होती . सायंकाळी सहा वाजता सकल हिंदू समाजातील युवक घोषणा देत मंदिर परिसरात आले . चौथर्‍यावर जल , गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले . शनीमूर्तीस पंचामृत अभिषेक करण्यात आला .

Informer : मराठी न्यूज नेटवर्क

संपादक :
किशोर दरंदले
9970818233

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *