बापरे बाप ! शनि देवाच्या नावाने सात बोगस ॲप.
प्रतिनिधी मोहन शेगर सोनई शनिशिंगणापूर बनावट ॲपच्या माध्यमातूनशनैश्वर देवस्थानची तिजोरी एक, दोन नव्हे तर तब्बल सात ॲपच्या माध्यमातून पोखरली जात असल्याचे प्रचंड धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे येथील आर्थिक घोटाळ्याची व्याप्तीही कल्पनाशक्तीच्या पलिकडे असण्याचा कयास बांधण्यात येऊ लागला आहे.देवस्थानला मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग बनावट अॅप, क्यू आर तसेच पावती पुस्तकांच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या वळवून करोडो…