सोनई, प्रतिनिधी ता. 8 – नेवासा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असली तरी दरात अपेक्षित वाढ झालेली नाही. गेले आठ महिने कांद्याचे भाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. साठवलेला व नवा कांदा विकावा की चाळीत ठेवावा, या कोंडीत शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्यावर्षी कांद्याच्या बियाण्याला अडीच ते तीन हजार रुपये पायली दर मिळाला होता. मात्र यावर्षी त्यात तब्बल हजार रुपयांची वाढ झाली आहे. बियाण्याबरोबरच मजुरी, औषधे, खते यांचेही दर वाढले आहेत. उलट कांद्याच्या विक्रीचे दर मात्र घसरले आहेत. मागील हंगामात जागेवर कांद्याला 11 ते 12 रुपये दर मिळत होता. त्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला. मात्र गेल्या आठ ते दहा महिन्यांत बाजारपेठेत सुधारणा झालेली नाही.
दरम्यान,हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. एप्रिल-मे महिन्यातील अतिउन्हाच्या झळा आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाचा चाळीतील कांद्याला फटका बसला. परिणामी कांदा सडू लागला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विकायला नेला तर दर नाही आणि चाळीत ठेवल्यास तो नासतोय, अशा दुहेरी कोंडीत शेतकरी अडकले आहेत.
चौकट: –
शेतकऱ्यांचा जमाखर्च बिघडला
“कांद्याच्या बियाण्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. मजुरी, औषधे, खते यांचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र कांद्याचे भाव गेल्या आठ महिन्यांपासून घटले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाही.”
— संदिप कुसळकर, शेतकरी
कांदा विकण्यापेक्षा सडतोय!
“गेल्या आठ महिन्यांपासून कांद्याला भाव मिळालाच नाही. चाळीत साठवलेला कांदाही आता पावसामुळे खराब होतोय. त्यामुळे मिळेल त्या भावात विकावं लागतंय, पण त्यात उत्पादन खर्चही निघत नाही.”
— अनिल निमसे, कांदा उत्पादक शेतकरी
कांदा हा शेतकऱ्यांच्या प्रमुख उत्पन्नाचा आधार आहे. त्याला योग्य दर न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडते. या परिस्थितीत लागवडीचे क्षेत्र घटण्याचीही शक्यता व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांचा तोटा रोखण्यासाठी सरकारने तातडीने हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी कृषी वर्तुळातून जोर धरू लागली आहे.
चौकट
ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
रस्त्याच्या कामात झालेल्या निकृष्ट दर्जामुळे यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या, पण अद्याप ठेकेदारावर कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी आहे संदीप कुसळकर म्हणाले, ” हा पूल अत्यंत जुना असून रात्रीच्या वेळी अपघात झाल्यास सळईमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. पुलाच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू न केल्यास प्रशासन आणि संबंधित ठेकेदार जबाबदार राहतील. शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”असा इशाराही संदीप कुसळकर यांनी दिला आहे.
ulda2c