अहिल्यानगर | अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची संयुक्त आढावा बैठक……

अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड यांसह उत्तर भागातील राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहता, भाबळेश्वर या तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आज ‘संवाद आढावा बैठक’ या पार पडली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती, संघटनात्मक सद्यस्थिती आणि आगामी दिशा यावर विचारमंथन झाले. ओबीसी आरक्षण, हक्कांचे संरक्षण आणि प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे यावेळी आवर्जून अधोरेखित केले.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रदेश प्रचारक डॉ. नागेश गवळी, प्रा. संतोष विरकर, अंबादास गारुडकर, सुभाष लोंढे, प्रशांत शिंदे, माजी महापौर भगवान फुलसुंदर,अण्णासाहेब शेलार, राहुल जावळे, महादेव पुंड, सचिन दरवडे, बाळासाहेब बोराटे, जालिंदर बोरुडे, खंडोजी भुकन, अनिल निकम, मुकुंद सोनटक्के, सुनील शिंदे, मच्छिंद्र चौधरी, गोरख आळेकर, रामभाऊ रायकर, किशोर जेजुरकर, वामन भदे, कांतीलाल कोकाटे, सुरेश रासकर, सावता हिरवे, साहेबराव रासकर, रमेश गोरे, अरविंद सोनटक्के यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील समता परिषदेचे पदाधिकारी, समर्पित समता परिषदेचे कार्यकर्ते आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

सुरेश पाटील :- शेवगांव – जिल्हा अहिल्यानगर, प्रतिनिधी

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले :-

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अश्याच नव नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *