
सोनई दिनांक 16 नुकतीच जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती साजरी केली परंतु दलितांच्या दलित वस्तीमध्ये नागरी सुविधा अभावी अनेक समस्यांना सध्या तोंड द्यावे लागत आहे यामध्ये सांडपाण्यामुळे प्रचंड प्रमाणात मच्छरांचे थैमान निर्माण झाले असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते यामध्ये ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या सुसंवाद नसल्यामुळे दोघांच्या वादात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यातच सोनईतील काही भागांमध्ये अद्याप विद्युत बल्ब नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य कायम आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय वैरागर यांनी सदर प्रश्न बाबत ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले असता काही ठिकाणी काही प्रमाणात विद्युत बल लावण्यात आले ते विद्युत बल काही दिवसाचे पाहुणे ठरले नवीन विद्युत बल्ब लावून सुद्धा काही उपयोग झाला नाही काही दिवसापुरता प्रकाश ग्रामस्थांना घेता आला परंतु सदर विद्युत बल पुन्हा लावण्यासाठी विद्युत कर्मचारी उपलब्ध होत नसल्याच्या कारणामुळे अंधाराची परिस्थिती आहे तसेच राहिली त्यामुळे मच्छरांचे प्रमाण आणखी वाढले यामुळे नागरिक पूर्णपणे हैराण झाले असून आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत याकडे लक्ष देईल काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे .
सोनई ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांनी त्वरित या प्रश्नात लक्ष घालावे
सामाजिक कार्यकर्ते संजय वैरागर .