लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, एप्रिलचा हप्ता कधी येणार? ‘ही’ तारीख आली समोर

महायुती सरकारच्या विजयात लाडक्या बहीणींचा मोठा वाटा होता. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात दर महिना 1500 रुपये देण्याची योजना तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारनं मागील अर्थसंकल्पात सुरु केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या योजनेचा निधी 1500 वरुन 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. नव्या सरकारचा कारभार सुरु झाला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार, हा प्रश्न सारखा चर्चेत येऊ लागला आहे. त्यातच एप्रिलचा हप्ता कधी येणार हा प्रश्नही विचारला जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2025) मुहुर्तावर मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार? याकडे आता लक्ष लागले आहे. मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली होती.

महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) जुलै 2024 पासून लागू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या, त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने निकष ही लावले आहे. या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे.

याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले होते की, ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे, त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेंतर्गत विचार केला जात नाही. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.

आता एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार आहे. महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती. यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *