मुंबई इंडियन्सचा डावखुरा गोलंदाज अश्वनी कुमारने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल पदार्पणात चार विकेट घेतल्या. प्रदार्पणातच अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला. “आधी थोडा दबाव होता. त्या दबावाने मी दुपारी जेवलोही नाही, असं त्याने डावाच्या मध्यावर मुलाखत देताना सांगितलं.
काय म्हणाला आश्विनी कुमार
मेगा लिलावात ३० लाख रुपयांना खरेदी झालेल्या अश्वनीने सांगितले की, संध्याकाळी ७.३० वाजता खेळ सुरू होणार होता. परंतु मी थोडा घाबरलो होतो. पहिलाच सामना असल्याने मला दबाव जाणवत होता. दुपारी जेवण करण्याची माझी इच्छाच नव्हती. मी फक्त एक केळ खाल्लं. पण तरीही, मी चांगला खेळलो. सामन्यांच्या मध्यावर आश्विनी कुमारने रचलेल्या विक्रमाबाबत त्याला आयोजकांनी विचारल्यावर त्याने हे उत्तर दिले.
प्रदार्पणातच बेस्ट स्पेल
आश्विनी कुमारने पदार्पणातच स्वप्नवत कामगिरी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला डीप पॉइंटवर झेलबाद केले. रिंकू सिंगलाही त्याच्या दुसऱ्या षटकात डीप पॉइंटवर झेलबाद केले. त्यानंतर तीन चेंडू नंतर मनीष पांडेला बाद करण्यात आले. या तिसऱ्या षटकात अश्वनीने आंद्रे रसेलला ५ धावांवर बाद केले. त्याने तीन षटकात २४ धावा देऊन ४ बळी घेतले.
हार्दिक पांड्याचा सपोर्ट
या कामगिरीबाबत बोलताना आश्विनी कुमारने कर्णधार हार्दिक पांड्याच्या सपोर्टचे कौतूक केले. तो म्हणाला की, एमआय संघ व्यवस्थापनाने मला प्रदार्पणाचा सामना असल्याने खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला होता. कर्णधार हार्दीक पांड्यानेही तू जशी गोलंदाजी करतोस, तशीच कर, असे सांगितले होते. आंद्रे रसेलने मला तिसऱ्या षटकांत पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर मी दोन शाॅर्ट बाॅल टाकले. त्यानंतर एक फूल लेंथ बाॅल टाकला. रसेल आक्रमन करायला चुकला आणि बाद झाला. मला या सर्व गोष्टीची पूर्वकल्पना हार्दिक पांड्याने दिली होती. आयपीएल पदार्पणात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा आश्विनी कुमार हा सहावा गोलंदाज ठरला. आयपीएलमध्ये पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम अल्झारी जोसेफच्या नावावर आहे. २०१९ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एमआयकडून १२ धावांत सहा बळी घेतले. आयपीएलमधील हा सर्वोत्तम डावांचा आकडा आहे. गुजरात लायन्सकडून रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध अँड्र्यू टायने १७ धावांत पाच बळी घेतले.
आयपीएल पदार्पणातील सर्वोत्तम आकडेवारी
अल्झारी जोसेफ (MI) – 6/12 वि SRH (2019)
अँड्र्यू टाय (GL) – 5/17 विरुद्ध RPS (2017)
शोएब अख्तर (केकेआर) – 4/11 विरुद्ध डीडी (2008)
अश्वनी कुमार (MI) – 4/24 वि केकेआर (2025)
केव्हॉन कूपर (आरआर) – 4/26 विरुद्ध केएक्सआयपी (2012)