
अकरा दिवस किर्तन महोत्सव.
सोनई (वार्ताहर) येथील ग्रामदैवत परिसरातील नागरिक भाविकांचे श्रध्दास्थान “श्री घोडेश्वरी देवी” चार शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारीदेवगड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य भास्करगीरीजी महाराज यांचे आशिर्वादाने पुर्ण झाली आहे. अकरा दिवस नामवंत ह. भ. प. किर्तनकार देवी चरणी आपली सेवा अर्पण करुन, समाज प्रबोधनाचे विदर्भ जागृतीचे कार्य करणार आहे .
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने, श्री घोडेश्वरी मंदिर व परिसरात आकर्षक व नेत्र दिपक विद्युत रोषणाई केली आहे. तर भाविकांसाठी दोनवेळा मोफत चहा फराळ मिळणार आहे. मंदिराकडे जाणारे रस्ते स्वच्छ करण्यात आले आहे.
हार, पानफुल, खेळणी,प्रसाद- मिठाई दुकान साठी जागा ठरवुन देण्यात आली आहे. भाविकांच्या सोईसाठी अनेक स्वयंसेवक यासाठी काम करत आहेत. स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग केली जाणार आहे. देणगी कक्ष असणार आहे. नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी, श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ प्रयत्नशिल आहेत.
या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये दि. २२ सप्टेंबर सोमवार पासुन २ ऑक्टोंबर गुरुवार पर्यंत अनुक्रमे हरिभाऊ महाराज करोलेकर,विलास महाराज मदने, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर,अमृतानंद सरस्वती माताजी, रामेश्वर महाराज राऊत, पद्माकर महाराज देशमुख, समाधान महाराज भोसेकर, मुक्तीनाथ गुरुयोगीनी माहेश्वरीनाथ, बाळासाहेब महाराज शेवाळे, नवनाथ महाराज म्हस्के,यांचे श्री घोडेश्वरी मंदिर परिसरात रात्री ७ते ९ या वेळेत किर्तन सेवा होणार आहे. शेवटच्या दिवशी पांडुरंगगीरी महाराज वावीकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ते ११ या वेळी होऊन महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
या किर्तन महोत्सव साठी भव्य असा वाॅटरप्रुफ मंडप उभारणी करण्यात येत आहे.
या महोत्सवासाठी घोडेश्वरी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व ग्रामस्थ यंदा कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातुन पायी ज्योत आणणार आहेत बुधवारी सायंकाळी सात वाजता घोडेगाव येथुन भाविक ज्योत आणण्यासाठी रवाना झाले आहे.
सदर शारदीय महोत्सव उत्कृष्टपणे सादर व्हावा,भाविकांना त्यांचा योग्य लाभ व्हावा यासाठी सर्वांनी आप आपल्या परिने योग्य सहकार्य करावे असे आवाहन श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांनी केले आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.