अगदी कोवळ्या वयात प्रेमात पडणं व त्यानंतर नको ते पाऊल उचलण्याच्या घटना सध्या महाराष्ट्रात वाढल्या आहेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील अमृतनगरमध्ये आज ऐन पाडव्याच्या दिवशी अशीच एक घटना उघडकीस आली. आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर कडाक्याचे भांडण झालेल्या १८ वर्षीत विद्यार्थ्याने गळफास घेऊन स्वतःला संपवले. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. मात्र एवढे टोकाचे पाऊल उचलण्याचे नेमके कारण काय, हे समजले नाही.
नेमके काय घडलं?
ठाण्यातील अमृतनगरमध्ये आज एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऐन पाडव्याच्या दिवशी ही घटना उघडकीस आली. कुटुंबाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह खाली घेऊन पंचनामा करुन तो पोस्टमार्टमला पाठवला. प्राथमिक तपासात, या विद्यार्थ्याचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मोबाईलवर बोलणे सुरु होते. त्यात या दोघांमध्ये वाद झाला. या विद्यार्थ्याने फोन ठेवल्यावर लगचे आत्महत्या केली, असे सांगितले जात आहे.
प्रेयसीसोबत झाला वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुण फोनवर आपल्या मैत्रिणीशी बोलत होता. या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की, मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणाने स्वतःला संपवलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी तो पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, भांडणाचं नेमकं कारण काय होतं? त्याच्या आत्महत्येमागे अजून काही कारण आहे का? याचा तपास सुरु आहे.
पोलिस काय म्हणतात
प्राथमिक माहितीत या विद्यार्थ्याचे त्याच्या मैत्रीणीशी भांडण झाल्यानंतर त्याने आत्महत्या केली, असे समोर आले आहे. मात्र हे भांडण कोणत्या कारणातून झाले किंवा आत्महत्येला अजून काही कारण आहे का, याचा शोध सुरु आहे. पोलिस तरुणाचे कॉल रेकॉर्ड आणि इतर माहिती तपासत आहेत. दरम्यान, एका फोन कॉलमुळे एका तरुणाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणांनी मानसिक तणावातून बाहेर येण्यासाठी मदतीची गरज असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.

A person necessarily help to make critically posts I would state. That is the very first time I frequented your website page and thus far? I amazed with the analysis you made to create this particular submit extraordinary. Wonderful task!