असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकारने एक खास योजना आणली आहे. श्रमयोगी योजनेअंतर्गत मोदी सरकार या लोकांना आर्थिक मदत करते. संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना दर महिन्याला पेन्शन मिळते. शिवाय त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनही दिली जाते. मात्र असंघटीत कामगारांना अशी सुविधा मिळत नाही. त्यामुळेच सरकारने ई-श्रम योजना अमलात आणली आहे.
योजनेचा कुणाला होणार लाभ?
असे व्यक्ती जे घरबसल्या काम करतात किंवा कुठे जाऊन मजदूरी करतात त्यांना श्रमिक म्हणतात.यामध्ये श्रमिकांमध्ये कर्मचारी पण सामील आहेत .जे एस आय सी व ईपीएफओ चे सदस्य नाही किंवा सरकारी कर्मचारी नाही, अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो.
ई-श्रम कार्डचे फायदे काय?
काही कारणामुळे जर श्रम कार्डधारकाचा मृत्यू झाला, तर सरकारद्वारे त्याला दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. तसेच अपंगत्व आले असेल तर, एक लाख आर्थिक सहाय्यता प्रदान केली जाते. सरकारी योजनेच्या अंतर्गत ई-श्रम कार्डधारक व्यक्ती साठ वर्षाच्या वयापर्यंत गेला तर त्याला तीन हजार रुपयांचे महिन्याला पेन्शन चालू होते. याशिवाय सरकार श्रमिकांना काही महामारी व नैसर्गिक संकटांमध्ये आर्थिक सहायता प्रदान करते. सरकार प्रामुख्याने गरीब व आर्थिक परिस्थितीने दुर्बळ असलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी हे श्रम कार्ड काढले आहे.
काय आहे योजनेची पात्रता?
- अर्जदार हा भारत देशाचा नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय हे 16 वर्ष ते 59 वर्षाच्या दरम्यान असावे.
- अर्जदाराचे महिन्याचे उत्पन्न हे 15000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे ई-श्रम कार्ड असणे आवश्यक आहे.
कागदपत्रे कोणती लागतात?
- ई-श्रम कार्ड
- आधार कार्ड
- बँक पासबुक(बँक आयएफएससी कोड)
- रहिवासी प्रमाणपत्र
- आय कार्ड प्रमाणपत्र
अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम अर्जदाराने अधिकृत शासकीय eshram.gov.in वेबसाईटवर जावे.
त्यानंतर “register ” या ऑप्शन वर क्लिक करा आणि स्वतःचा आधार नंबर टाका.
आधार नंबरच्या मोबाईल नंबरची लिंक असेल त्यावर एक ओटीपी येईल तो टाका.
आवश्यक असणारी सर्व माहिती भरा.जसे नाव ,पत्ता ,जन्मतारीख इत्यादी.
आवश्यक असलेले कागदपत्रे जोडा. जसे आधार कार्ड,आय प्रमाणपत्र अपलोड करा.
सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर एकदा फॉर्म चेक करा व सबमिट बटन वर क्लिक करून अर्जाची प्रिंट डाउनलोड करा.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया कशी आहे?
- जवळच्या सरकारी कार्यालयात किंवा अंगणवाडी केंद्रामधून फॉर्म प्राप्त करा.
- फॉर्म मधील आवश्यक माहिती भरा व जरुरी कागदपत्रे जोडा.
- भरलेला फॉर्म हा संबंधित कार्यालयांमध्ये वेळेच्या आधी जमा करा.