
शिर्डी- शनिशिंगणापूर रस्त्यावरील अतिक्रमणे निघणार; शनिआमावस्येची मूदत संपली, धाकधूक वाढली
जिल्ह्यात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील अतिक्रमणे काढल्यानंतर आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या सोनईतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. राहुरी- सोनई व सोनई घोडेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने आता ही अतिक्रमणे येत्या आठ दिवसांत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिक्रमणाबात पाच नोटीस राहुरी-सोनई-शनिशिंगणापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.१६०-सीवरील अतिक्रमणे काढणेबाबत…