जिल्ह्यात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील अतिक्रमणे काढल्यानंतर आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या सोनईतील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. राहुरी- सोनई व सोनई घोडेगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने आता ही अतिक्रमणे येत्या आठ दिवसांत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अतिक्रमणाबात पाच नोटीस
राहुरी-सोनई-शनिशिंगणापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.१६०-सीवरील अतिक्रमणे काढणेबाबत काही दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. अतिक्रमण काढण्यासाठी सोनई गावात विविध दुकानदारांना नोटिसा देण्यात आली आहे. प्रशासनाकडून 8 दिवसाची मुदत देण्यात आली होती . त्यासाठी खालील पाच प्रकारच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या.
१) Bombay Highway Act no.LV of१९५५ (The Maharashtra Highways Act)
२) महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, शासन निर्णय क्र. कडोंमपा-१००६/प्र.क्र.१९२/२००६/२८ दि ०२/०३/२००९
३) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन-०७/२०१३/प्र.क्र.२०४/२ दिनो १०/१०/२०१३
४) महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक- टिपीएस-१८११/अनीस ३६/१९/नवि-१३ दि.५/८/२०१९
५) महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन निर्णय क्रमांक- साज-२०२४/प्र.क्र.१७९/ দি दि.२३/०१/२०२५
काय म्हणाले अभियंता
उपविभागीय अभियंता तसेच राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान असे निर्देशनास आले की, राहुरी-सोनई-शनिशिंगणापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.१६०-सी वरील साखळी क्र. ०/०० ते २६/१६० रस्त्याच्या हद्दीत अवैधरित्या अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यास अनुसरुन आपणास राष्ट्रीय महामार्ग जमीन व वाहतूक नियम २००२ कलम २६ अन्वये न बजाविण्यात येत आहे. आपल्याद्वारे महामार्गाच्या हद्दीत (रस्त्याच्या मध्यापासून प्रत्येकी दोन्ही बाजूस १५ मीटर असे एकूण ३० मीटर) करण्यात आलेले अवैध अतिक्रमण नोटीस मिळालेल्या तारखेपासून आठ दिवसाच्या आत स्व काढून घ्यावे अन्यथा सदर बाबतीत पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार नाही. अतिक्रमण आपण स्वतः काढून न घेतल या खात्यामार्फत काढले जाईल व होणाऱ्या नुकसानीस आपणास जबाबदार धरुन संपूर्ण सरकारी खर्च आपन दंडासह वसूल केले जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
अतिक्रमण आठ दिवसांत सुरु
यापूर्वी अतिक्रमण मोहिम सुरु झाली होती, मात्र शनिआमावस्येची गर्दी लक्षात घेता अतिक्रमण मोहिम ३१ मार्चपर्यंत थांबविण्यात आली होती. आता नवीन आदेशानुसार ही मोहीम एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल. म्हणजेच येत्या दोन-तीन दिवसांत हे अतिक्रमण काढायला सुरुवात होईल. सोनईत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण एकाच दिवसांत निघणे शक्य नाही, असे सामाजिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या दोन दिवसांत ही मोहीम सुरु होईल, अशी शक्यता आहे.
व्यावसायिकांचे टेन्शन वाढले
अतिक्रमण काढणार हे स्पष्ट झाल्यानंतर व्यावसायिकांचे टेन्शन वाढले आहे. काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र मजूरांची कमतरता पाहता अजूनही ८० टक्के अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढणे बाकी आहे. सरकारी यंत्रणेचा दंड पाहता स्वतःहून अतिक्रमण काढण्यास व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. काहींनी कर्ज काढून पक्के बांधकाम केल्याने हे कर्ज आता फेडायचे कसे, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.