शिर्डी-शनिशिंगणापूरला भाविकांची गर्दी, पाडव्याच्या सणाला अभूतपूर्व उत्साह

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवसांपासून मराठी नवीन वर्ष सुरु होते. गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. हिंदू धर्मात गुढी पाडव्याला खूप महत्व आहे. राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने शिर्डी, मढी, मायंबासह शनिशिंगणापूर परिसरात शोभायात्रा काढल्या जात आहेत. तसेच यानिमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र गुढी उभारुन, गोडाधोडाचे पदार्थ करुन नवीन वर्षाचा आनंद साजरा केला जात आहे. सध्या सर्वत्र चैतन्यमय वातावरण हा सण साजरा होत आहे.

महाराष्ट्रातील पहिली गुढी तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर


नववर्षाची महाराष्ट्रातील पहिली गुढी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कळसावर उभारण्यात आली आहे. विधिवत पूजा करत देवीच्या महंत, पुजाऱ्यांनी ही गुढी उभारली. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक शुभ मुहूर्त असल्याने आणि मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत असल्याने देवीची शिवकालीन दागिने घालून अलंकार पूजा करण्यात आली. देवीची पहाटे 5 वाजता आरती करुन तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधीवत पूजा करुन गुढी उभारण्यात आली. तुळजापूर मंदिरावर गुढी उभारण्यात आल्यानंतर तुळजापूर शहरात नागरिक गुढी उभी करतात.

गुढीपाडव्यानिमित्त शिर्डीत गर्दी


काल शनिवारी २९ मार्चला शनिआमावस्या होती. त्यामुळे शिर्डी व शनिशिंगणापूर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. काल दिवसभर या दोन्ही देवस्थानात गर्दी होती. आज सकाळी शनिशिंगणापूरला कावडीच्या पाण्याने देवाला आंघोळ घातली गेली. नेवासा तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या पालख्यांनी आज दिवसभर शनिशिंगणापूर गजबजलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *