गुढीपाडवा म्हणजे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा सण आहे. कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दुसरी बाब म्हणजे गुढीपाडव्याच्या सणापासून मराठी नवीन वर्षाची देखील सुरुवात होते. प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करुन सीतामातेसह त्यांच्या नगरीत परतले तो दिवस देखील चैत्र शुक्ल प्रतिपदा होता, यासाठी हा दिवस वर्षाचा पहिला दिवस मानतात, असेही म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नान करुन लहान-थोर सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. घरासमोर गुढी उभारुन तिची मनोभावे पूजा करतात- सणाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात.
तुम्ही देखील गुढीपाडव्यानिमित्त तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला खास मेसेज, फोटो, पाठवून तुम्ही शुभेच्छा पाठवायला अजिबात विसरू नका…
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडवा शुभेच्छा संदेश 2025
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट…
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा-आकांशा,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
पालवी चैत्राची अथांग स्नेहाची,
जपणूक परंपरेची,
उंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची, संपन्नतेची,
उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरुवात…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
काठीला गंध, फुलं, अक्षता
नैवेद्याला साखर, पेढा, दुधाचा लोटा
लावावे निरांजन, दाखवावी उदबत्ती
अभिमानाची गुढी दारी,
हीच खरी संपत्ती…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दु:ख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
राग-रुसवे विसरुन
वाढवा नात्यातला गोडवा
एकत्र येऊन साजरा करुया
सण गुढीपाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्नतेचा साज घेऊन,
येवो नवीन वर्ष,
आपल्या जीवनात नांदो,
समृद्धी, समाधान आणि ङर्ष
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नववर्षाची सुरुवात होवो न्यारी,
सुख-समृद्धीने सजो आपली गुढी,
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आरंभ आहे चैत्र मासाचा
गुढी तोरणे सण उत्साहाचा
पूर्ण होवोत तुमच्या इच्छा-अपेक्षा
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडवा म्हणजे नव्या संधींचे दार उघडणारा दिवस!
या नवीन वर्षात तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
आयुष्यात सुख-शांती आणि भरभराट मिळो.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2025
गुढी उभारून नव्या स्वप्नांना बळ देऊ!
हा शुभ दिवस तुम्हाला यश, समाधान आणि शांती घेऊन येवो.
तुमच्या सर्व योजना यशस्वी होवोत.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2025
सुखसमृद्धीच्या गुढीला सोन्याचा कळस लाभो!
नव्या वर्षाच्या शुभेच्छांसह तुमच्या जीवनात आनंद, यश आणि आरोग्य येवो.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2025
हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
आरोग्य, सुख, समृद्धी आणि शांतीने भरून टाको.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2025